अकोला - उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोरगाव भाकरे शेतशिवारात हरभऱ्याच्या शेतीची राखण करणाऱ्या एका ५४ वर्षीय शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शिवनाथ गोरखनाथ भोईटे असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा -अंत्यविधीवरून परतणाऱ्या 7 जणांवर काळाचा घाला; 5 गंभीर
भोईटे यांच्या पत्नी लता शेतात हरभरा सोंगणीसाठी आल्या असता त्यांना मचाणावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिनी सोळंके आणि उरळ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.
हेही वाचा -आम्ही 'तो' व्हिडिओ सार्वजनिक केला नाही, जामिया विद्यापीठाचे स्पष्टीकरण
मोरगाव भाकरेच्या बाखराबाद-भौरद रस्त्यावर भोईटे यांची शेती आहे. शेतात गहू आणि हरभरा असल्याने ते रात्रंदिवस राखण करत होता. नेहमीप्रमाणे राखणदारी करीत असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर आणि पायावर धारधार शस्त्राने मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळाजवळच काही लाकडे पेटलेली होती. त्यावर पडल्याने भोईटे भाजले गेले. त्यांना तशाच अवस्थेत मचाणावर ठेवून मारेकरी पसार झाले असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला आहे.