अकोला - जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना अनेक गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे, तर पाण्याअभावी फळबागा धोक्यात आल्या आहेत. अकोल्यातील तेल्हारा, अकोट परिसरातील शेतकऱ्यांना फळबागा वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. संत्र्याची 300 झाडे वाचवण्यासाठी शेतकरी टँकरने झाडांना पाणी देत आहे.
दुष्काळाच्या झळा; संत्र्यांच्या बागांना द्यावे लागत आहे टँकरने पाणी - orange trees
बोअरवेल व विहिरी कोरड्या पडल्यामुळे काही शेतकरी अक्षरशः टँकरने पाणीपुरवठा करून फळबागा जगवत आहेत. त्यामुळे टँकरच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकभुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अकोट, तेल्हारा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी डाळिंब, संत्रा, लिंबू, केळीसह फळबागांची लागवड केली आहे. सध्याच्या संकटकाळात काही शेतकरी पाणी विकत घेऊन फळबागा जगवण्यासाठी धडपड करत आहेत. फळबागांसाठी टॅकरचे पाणी विकत घेतले जात असून पाच हजार लिटरच्या टॅकरसाठी साधारणपणे सहाशे रुपये खर्च येत आहे. मात्र, पाच हजार लीटर पाण्यावर काहीही होत नसल्याने वीस हजार लिटरपेक्षाही जास्त पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दोन ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. फळबागांवर होणारा खर्च आवाक्याबाहेर जात असतानाही फळबागा जगवाव्या लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची परस्थिती हलाखीची आहे, त्यांनी तर फळबागा सोडून दिल्या आहेत. फळबागा पाण्याशीवाय जळतानाचे चित्र सध्या दिसत आहे.