अकोला - खराब झालेली पिके पाहण्यासाठी आज केंद्रीय पथक म्हैसपूर येथे आले होते. या पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांनी फक्त पाहणीस केल्या जात आहे. मदत होत नसल्याचा आरोप केला मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय पथक यांनी शेतीची पाहणी केली. मात्र, त्यानंतर काय असा सवालही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.
फक्त पिके पाहूनच जात आहेत; भरपाई केव्हा - शेतकऱ्यांचा आर्त टाहो - News about the Central Surveillance Team
खराब झालेली पीके पाहण्यासाठी आज केंद्रीय पथक म्हैसपूर येथे आले होते. या वेळी शेतकऱ्यानी मदत केव्हा मिळणार असा प्रश्न केला.
या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी अकोला जिल्ह्यातील हायस्कूल येथे पिकांची पाहणी केली त्यानंतर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री आल्यानंतर मदतीची आस लागली होती. मात्र, सरकार स्थापनेचा तिढा वाढत असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवड लागली राज्यपालांनी चार दिवस आधी शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर केले. मात्र, अद्यापही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. शनीवारी केंद्रीय पथक ज्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले होते त्या ठिकाणी खराब पिक पाहण्यासाठी गेले होते. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांत सोबत संवाद साधला नाही. मात्र, शेतकऱ्यांनी आपल्या मनातील तळमळ व्यक्त करत सरकार मदत केव्हा करेल असा प्रश्न उपस्थित केला
मुख्यमंत्र्यांनी शेतीची पाहणी केली आता केंद्रीय पथकही शेतीची पाहणी करून जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याचा अर्थः शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. लोकप्रतिनिधी हे सरकार स्थापनेच्या गडबडीत गेल्या काही दिवसांपासून आहे. मात्र, शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित झाला असून या बाबत सरकारने तरी लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.