अकोला - एकिकडे कोरोनाग्रस्तांवर आरोग्य अधिकारी उपचार करीत आहेत. तर दुसरीकडे पोलीस बाहेर राहून संचारबंदीचे नियम नागरिकांनी कडेकोट पाडावे, यासाठी परिश्रम घेत आहे. त्यामुळे येथील माजी सैनिकांनी अशा कठीण परिस्थितीत कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच गरज भासल्यास आम्ही ही मदतीला धावून येऊ, असे आश्वासन माजी सैनिकांनी पोलिसांना दिले. अशोक वाटिका चौकात माजी सैनिकांनी पोलिसांचा सत्कार करताना म्हटले.
गरज भासल्यास आम्ही मदत करु म्हणत माजी सैनिकांनी केली पोलिसांवर पुष्पवृष्टी - akola
कोरोनाविरोधाच्या लढ्यात आपले जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या पोलिसांवर अकोल्यातील माजी सैनिकांनी पुष्पवृष्टी केली. तसेच गरज भासल्यास आम्हीही कोरोनाविरोधातील या लढ्यात मदत करू, असे आश्वासनही दिले.
कोरोना विषाणूला हरविण्यासाठी सर्वच प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पण, प्रशासनाला नागरिकांचे हवे तसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे पोलिसांचा कडा पहारा रस्त्यावर आहे. संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. तरीही पोलीस आपले धैर्य सांभाळून नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिसांचे हे कार्य मोठे असून या कार्याला माजी सैनिकांनी त्यांना सलाम केला आहे. अशोक वाटिका चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे माजी सैनिकांनी आभार मानले. यावेळी वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक संघटनेचे पी. एन. गुजर, विष्णु डोंगरे, आर. बी. खांबलकर, अब्दुल रशीद, गजानन दांडगे, नितीन कुकडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
हेही वाचा -आणखी दोघांचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल; डॉक्टरसह पाच जणांचा समावेश