अकोला -शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बेपत्ता झालेले देवराव वाघमारे यांच्या शोधासाठी अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे, देवराव वानखडे वाघमारे यांचे मोठे बंधू गजानन वाघमारे यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : बेपत्ता देवराव वाघमारे प्रकरणी चौकशी समिती स्थापन
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विसवी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देवराव वाघमारे हे 21 ऑगस्टला उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची कोविड तपासणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, 23 ऑगस्टला दुपारपासून ते रुग्णालयातून बेपत्ता झाले.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विसवी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देवराव वाघमारे हे 21 ऑगस्टला उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची कोविड तपासणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, 23 ऑगस्टला दुपारपासून ते रुग्णालयातुन बेपत्ता झाले. देवराव वाघमारे यांचे भाऊ गजानन वाघमारे यांनी 'भावाला भेटू द्या, त्यांची प्रकृती कशी आहे ती सांगा?, माझा भाऊ जिवंत परत द्या किंवा मृत दाखवा', अशी मागणी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला केली. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यानंतर गजानन यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डोंगरे यांनी हे प्रकरण लावून धरले.
तसेच रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारणा केली. डोंगरे यांनी वाघमारे यांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच 11 सप्टेंबर रोजी आत्मदहनाचाही इशारा दिला होता. या संपूर्ण प्रकाराबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच लवकरात लवकर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती अहवाल केव्हाही देईल. मात्र, बेपत्ता झालेले देवराव वाघमारे हे लवकर सापडावे, अशी अपेक्षा गजानन वाघमारे यांनी केली आहे.