अकोला - राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. हा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
सातव्या वेतन आयोगासाठी कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. हा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर सभा घेऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे स्वरुप स्पष्ट केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. परिणामी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये हीच परिस्थिती आहे. या वेतनासाठी चारही विद्यापीठातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून लेखणीबंद आंदोलन केले. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास विविध मार्गांनी निषेध नोंदवून सरकारकडून सातवा वेतन आयोग मिळवून घेण्याचा निर्धार केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. यामुळे सध्या विद्यापीठ बंद राहणार आहे.