अकोला Employee Attempt Suicide in Akola : अकोला महापालिकेच्या (Akola Municipal Cooperation) हद्द वाढीतील कर्मचाऱ्यांना अजूनही मनपामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. यामुळं या कर्मचाऱ्यांनी महापालिकेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस कर्मचारी आणि मनपा सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याठिकाणी 20 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांनी अनेकनेळा दिली निवेदने : अकोला महापालिकेत 20 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर तेथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मनपामध्ये समाविष्ट करण्यात येणार होते. परंतु, अद्यापही या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. या कर्मचाऱ्यांनी समाविष्ट करून घ्यावे, यासाठी अनेकवेळा बैठकी घेऊन निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्या. तरीही त्यांना मनपात समाविष्ट करण्यात आलेलं नाही. या संदर्भात 116 कर्मचाऱ्यांपैकी 41 कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र शेवटी त्रुटी आणि तांत्रिक कारणांमुळे केवळ 26 कर्मचारीच पात्र ठरले. अधिवेशनात सुद्धा कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु अकोला महापालिकेनं अजूनही या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घेतलं नाही. विशेष म्हणजे सरकार आणि न्यायालयानं महापालिकेला यासंदर्भात आदेश दिल्यानंतरही या आदेशाला मनपानं केराची टोपली दाखवलीय. (Employee Attempt Suicide in Akola)