अकोला - आज सकाळी आलेल्या अहवालानुसार, कोरोना रुग्णांच्या संख्येत11 जणांची वाढ झाली आहे. अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यातील रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी शहरातील रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या 832 वर पोहोचली आहे.
प्राप्त अहवालात सहा महिला आणि पाच पुरुष आहेत. काही रुग्ण जुन्या शहरातील, तर उर्वरित माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु, तापडीया नगर, अकोट फैल, जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णआहे.
प्राप्त अहवाल-११३
पॉझिटिव्ह-११
निगेटिव्ह-१०२