अकोला- महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून अर्चना जयंतराव मसने आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून नगरसेवक राजेंद्र गिरी यांनी अर्ज भरला आहे. तसेच यांची निवड ही निश्चित मानली जात आहे. काँग्रेसकडून अजनाबी नसरीन यांनी महापौर तर, उपमहापौरसाठी पराग कांबळे यांनी अर्ज भरले आहेत.
अकोला महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी 22 नोव्हेंबरला निवडणूक हेही वाचा -नागपुरात 'आरएसएस'च्या विशेष तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात
शिवसेनेकडून याठिकाणी अर्ज दाखल करण्यात आले नाहीत. तर, भाजपकडूनच अनुराधा नावकार आणि उपमहापौरसाठी दीपक मनवानी यांनीही अर्ज दाखल केले आहेत. मात्र, भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने महापौरसाठी अर्चना मसने आणि उपमहापौरसाठी राजेंद्र गिरी यांची निवड निश्चित मानली जात आहे.
अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवारी, 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. दोन्ही पदांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी 22 नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नगरविकास विभाग मंत्रालयाचे अप्पर सचिव यांच्या निर्देशान्वये आणि अमरावती विभागीय आयुक्त यांच्या सुचनेनुसार अकोला महापालिकेचे नगरसचिव अनिल बिडवे यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापालिकेची 22 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर राहणार आहेत. निवडणूक सुरू होण्याच्या आधी छाननी व त्याआधी 15 मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.