महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भाऊ, आम्ही तुमच्याच सोबत'; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांचे उमेदवारांना आश्वासन

निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार हा आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, उमेदवार मतदारांना आश्वासन देत असले तरी मतदार हेदेखील त्यांच्या पुढे असल्याचे चित्र आहे. 'भाऊ, आम्ही तुमच्याच सोबत' असे आश्वासन मतदार हे प्रत्येक उमेदवारांना देत आहेत.

उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात

By

Published : Oct 18, 2019, 7:14 PM IST

अकोला - निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गावोगावी कॉर्नर मिटिंग आणि गावातून छोट्या छोट्या प्रमाणात रॅली काढून प्रत्येक उमेदवार आपले मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, उमेदवार मतदारांना आश्वासन देत असले तरी मतदार हेदेखील त्यांच्या पुढे असल्याचे चित्र आहे. 'भाऊ, आम्ही तुमच्याच सोबत' असे आश्वासन मतदार हे प्रत्येक उमेदवारांना देत आहेत.

उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात

अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा जोर शेवटच्या टप्प्यात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार, मित्र पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात जाऊन कॉर्नर मिटिंग घेणे, छोट्या प्रमाणात रॅली काढणे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना भेटण्याचा सपाटा प्रत्येक उमेदवारांनी लावला आहे. त्यामुळे, ग्रामस्थही येणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे तसेच अपक्ष उमेदवारांचे स्वागत करताना दिसून येत आहे.

हेही वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादी ही भ्रष्टवादी आघाडी - पंतप्रधान मोदी

अनेक ठिकाणी ग्रामस्थ उमेदवारांना आश्वासनाची खिरापत देत असल्याचे चित्र आहे. 'भाऊ आम्ही तुमच्या सोबतच, असे सांगून उमेदवारांचे मनोबल वाढवत आहे. परंतु, उमेदवारांचे वाढवलेले हे मनोबल निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार असल्याने, उमेदवारही ग्रामस्थांच्या ह्या आदरातिथ्याने भारावून जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - दिवाळीच्या तोंडावर परराज्यातून आलेला 700 किलो खवा जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details