अकोला- जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 232 जणांची कोरोना तपासणी केली गेली. यामध्ये 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, उपचार घेत असलेल्या एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 झाली आहे. यापैकी एका रुग्णाने आत्महत्या केली होती.
अकोल्यात आणखी अठरा जण कोरोना पॉझिटिव्ह, मृतांच्या संख्येतही वाढ - total died corona patients in akola
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 232 जणांची कोरोना तपासणी केली गेली. यामध्ये 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, उपचार घेत असलेल्या एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 20 झाली आहे
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालातील एका पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण चिराणीया कंपाऊंड रामदास पेठ येथील 68 वर्षीय व्यक्ती आहे. रुग्ण 16 मे रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. तर, उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला आणि अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. याशिवाय मंगळवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण 62 वर्षीय व्यक्ती असून सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती 15 मे रोजी दाखल झाला होता. त्यांचा अहवाल 17 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सध्या 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्या भागांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याठिकाणी प्रशासनाकडून परिसर सील करण्यात आला असून आरोग्य विभागातर्फेही तपासणी करण्यात येत आहे.