अकोला - कोरोना रुग्णांच्या संस्थेमध्ये आज(बुधवार)सकाळी 11 आणि सायंकाळी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या दिवशी एकूण 18 रुग्ण हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर, एका रुग्णाचा उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला. त्यासोबतच 20 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
अकोल्यात 18 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 20 जणांची कोरोनावर मात; एकाचा मृत्यू
जिल्ह्यात आज एकूण 18 जणांचे अहवाल रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात सकाळी 11 आणि सायंकाळी 7 जणांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यात एक महिला असून अन्य सहा पुरुषांचा आहे. दरम्यान, आज दुपारनंतर दहाजण कोव्हीड केअर सेंटरमधून तर दहा जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून, असे एकूण 20 जणांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात आज सायंकाळी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एक महिला असून अन्य सहा पुरुषांचा आहे. त्यातले तिघे डाबकी रोड येथील तर अन्य जुने शहर, पोळा चौक, मोठी उमरी, रजपुतपुरा येथील रहिवासी आहेत. दुपारी उपचार घेतांना पातुर येथील रहिवासी असलेल्या एका 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण 24 जूनरोजी उपचारार्थ दाखल झाला होता, त्याचा आज मृत्यू झाला. दरम्यान, आज दुपारनंतर दहाजण कोव्हीड केअर सेंटरमधून तर दहा जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून, असे एकूण 20 जणांना घरी सोडण्यात आले.
प्राप्त अहवाल - २१२
पॉझिटिव्ह अहवाल - १८
निगेटिव्ह - १९४
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १५६८
मृत - ८० (७९+१)
डिस्चार्ज - ११६५
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३२३