अकोला - अकोल्यात 72 रुग्ण सापडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गुरुवारी नऊ आणि आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आठ रुग्ण सापडले आहेत. अकोलेकरांसाठी ही बाब चांगली असली तरी रुग्ण संख्या कमी झाली असली तरी, थांबलेली नसल्याने चिंता वाढवीत आहे.
अकोल्यात आणखी आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; 146 अक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 524 वर गेली असून 146 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 349 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 524 वर गेली असून 146 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 349 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत. यातील दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यू खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल - 157
पॉझिटीव्ह - 8
निगेटीव्ह - 149
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 524
मयत - 29 (28+1)
डिस्चार्ज - 349
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 146