अकोला - मूर्तिजापूर व अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात 93.91 टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आज सकाळी आठ दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्यानंतर धरणाजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन लक्ष ठेवून आहे.
काटेपूर्णा प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडले; 94 टक्के पाणीसाठा
या प्रकल्पातून 200.64 प्रति सेकंद घनमीटर विसर्ग सुरू आहे. एक फूट दरवाजे उघडले आहेत. प्रकल्पातील जलसाठा हा 88 ते 89 टक्के होईपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. सध्या जलसाठा 93.91 टक्के झाला आहे. रात्री पासून चार दरवाजे एक फुटाने उघडले होते. आज सकाळी आणखी चार दरवाजे एक फुटाने असे एकूण आठ दरवाज्यांमधून पाण्याचा सांडवा करण्यात येत आहे.
या प्रकल्पातून 200.64 प्रति सेकंद घनमीटर विसर्ग सुरू आहे. एक फूट दरवाजे उघडले आहेत. प्रकल्पातील जलसाठा हा 88 ते 89 टक्के होईपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. सध्या जलसाठा 93.91 टक्के झाला आहे. रात्रीपासून चार दरवाजे एक फुटाने उघडले होते. आज सकाळी आणखी चार दरवाजे एक फुटाने असे एकूण आठ दरवाज्यांमधून पाण्याचा सांडवा करण्यात येत आहे.
31 ऑगस्ट पर्यंत 95 टक्के जलसाठा प्रकल्पात ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 20 ऑगस्टपर्यंत पाऊस जास्त पडणार असल्याचा अंदाज असल्याने ही उपाययोजना करण्यात येत आहे, अशी माहिती काटेपूर्णा प्रकल्पाचे शाखा अभियंता निलेश घारे यांनी दिली. तसेच यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभाग, जवळपासच्या गावांना माहिती देण्यात आली आहे.