अकोला -जिल्ह्यातकोरोनाबाधित रुग्ण संख्येत आज सकाळी ८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यासोबतच एका 45 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकोल्यात रुग्ण संख्येसोबतच मृत्यूदर ही वाढत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालानुसार आज ८ जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात एक महिला व सात पुरुष आहेत. दोन जण रजपुतपुरा येथील रहिवासी आहेत तर उर्वरित बेलोदे ले आउट, नीता गेस्ट हाऊस कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फ़ैल, हनुमान बस्ती संतोषी माता मंदिर,माळीपूरा, गायत्री नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, एका रुग्णाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मृत व्यक्ती हा नायगाव येथील 45 वर्षीय पुरुष रुग्ण होता. तो 3 जून रोजी रुग्णालयात दाखल झाला होता, त्याचा आज पहाटे मृत्यू झाला.
प्राप्त अहवाल-६०
पॉझिटीव्ह-०८