अकोला -जिल्ह्यातील बाळापूर शहराला आज (शनिवारी) दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल इतकी होती. अकोल्याच्या पश्चिमेपासून 19 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाने दिले आहे.
अकोल्यातील बाळापूरला भूकंपाचा सौम्य धक्का; हवामान विभागाची माहिती - अकोला भूकंप
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरांमध्ये दुपारी तीन वाजून 45 मिनिट सहा सेकंदांनी भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल एवढी होती. अकोल्याच्या पश्चिमेपासून 19 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरांमध्ये दुपारी तीन वाजून 45 मिनिट सहा सेकंदांनी भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल एवढी होती. अकोल्याच्या पश्चिमेपासून 19 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. भूकंप आल्याचा सौम्य झटका बाळापुर वासियांना बसला होता. काही क्षणाचा हा धक्का असल्याने त्यांनाही भूकंप आला असल्याचे वाटले नाही. या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाचे प्रमुख एस. एस. साबळे यांनी दिली आहे. या भूकंपाची नोंद घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.