अकोला -महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयमध्ये आज (रविवार) घेण्यात आला. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी उभारलेल्या या संस्थेचा नावलौकिक निर्माण करणे हे आपलं काम आहे. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या बिंदूला रेषा करण्याचे कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे, असे अमृत महोत्सवाच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम सोहळा रविवारी श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातामध्ये संपन्न झाला. या सत्कार समारंभाला उत्तर देताना विठ्ठल वाघ यांनी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ज्या शिक्षकांनी तुकाराम गाडगेबाबा नामदेव पंजाबराव देशमुख यांचे जीवनपट वाचले नाही, ते विद्यार्थ्यांना घडवू शकत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या 'तिफन' आणि 'बाप' या दोन्ही सुप्रसिद्ध कविता म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.