अकोला - राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. सरकारने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात सातवा वेतन लागू करावा, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आज सामूहिक रजा आंदोलन केले. विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावर सभा घेऊन त्यांनी आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट केले. त्यानंतर सोमवारपासून कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी कामबंद आंदोलन सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन हेही वाचा -अर्णबला यांना जेल की बेल? उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
विद्यार्थ्यांवर होणार का परिणाम?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. परिणामी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये हीच परिस्थिती आहे. या वेतनासाठी चारही विद्यापीठातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काळ्या फिती लावून आंदोलन, त्यांनतर लेखणीबंद आंदोलन केले. तरीही मागण्या मान्य झाल्या नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून सरकारकडून सातवा वेतन आयोग मिळवून घेण्याचा निर्धार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला होता. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर एकत्र येत आज सामूहिक रजा आंदोलन केले. तसेच सरकार विरोधी नारेबाजी केली. आता कर्मचाऱ्यांकडून सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे विद्यापीठ पूर्ण पणे बंद राहणार आहे.
हेही वाचा -तूर्तास दिवाळीनंतर कॉलेज सुरू करण्याचा कोणताही निर्णय नाही - उदय सामंत