अकोला- शासकीय परवाना नसतानाही कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयात भरती करून उपचार करणाऱ्या मूर्तिजापूर येथील एका डॉक्टरविरूद्ध शहर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. डॉ. पुरुषोत्तम चावके असे त्या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश कराळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात आली.
डॉ.चावके विरूद्ध मूर्तिजापुरात गुन्हा दाखल; विना परवाना कोरोना रुग्णांवर केले उपचार - विना परवाना कोरोना रुग्णांवर उपचार
वैद्यकीय पथकाने येथील केळकर वाडीतील संतकृपा क्लिनिक बाल व जनरल केअर सेंटरला आकस्मिक भेट दिली होती. त्यावेळी रुग्णालयात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले

कराळे यांच्या तक्रारीनुसार आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयसिंह जाधव, राज्यस्तरीय कोविड नोडल अधिकारी डॉ. सुभाष साळुंके यांच्या वैद्यकीय पथकाने येथील केळकर वाडीतील संतकृपा क्लिनिक बाल व जनरल केअर सेंटरला आकस्मिक भेट दिली होती. त्यावेळी रुग्णालयात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासाअंती डॉ. पुरुषोत्तम चावके (३१) यांच्याकडे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी आरोग्य विभागाचा कोणताही परवाना आढळला नाही.