अकोला - कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. एका डॉक्टरने महिला रुग्णाचा विनयभंग केला. यामुळे पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण -
खामगाव तालुक्यातील एका गावातील आई व भावासोबत आलेल्या एका महिलेने, दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याच्या कारणावरून दुर्गा चौकातील डॉ. पुरुषोत्तम तायडे यांच्या अमृत रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाली. डॉक्टरने तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला कक्षात बोलाविले. परंतु, डॉक्टराने तिच्या आई व भावाला बाहेरच उभे केले. त्या दोघांना शंका आल्याने त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरने त्या दोघांना कक्षाच्या बाहेर काढले.