अकोला- जिल्हा परिषद निवडणुकीत अटीतटीच्या ठरलेल्या बाभूळगाव गटातून भारीपचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांनी विजय मिळवला आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी ताकद लावली होती. मात्र, अखेर सुलताने यांनी बाजी मारली.
अटीतटीच्या लढतीत भारीपचे महासचिव सुलताने विजयी - babhulgaon zp election at akola
अटीतटीच्या ठरलेल्या बाभूळगाव येथील जिल्हा परिषद निवडणुकीत भारीपचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांनी विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषद बाभूळगाव गटातून शिवसेनेचे मुकेश मुरूमकर आणि भारिप बहुजन महासंघाचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात अटीतटीची लढत होती. विशेष म्हणजे सुलताने यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली होती. शिवसेनेचे उमेदवार मुकेश मुरूमकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती.
दरम्यान, मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या जिल्हा परिषद गटामधून शिवसेनाच विजयी होणार असल्याची चर्चा जोरात होती. मात्र, अंतिम निकालानंतर सुलताने यांनी विजय मिळवित पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपप्रचार करणाऱ्यांना दणका दिला.