महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निष्क्रीय भरारी पथकाबाबत चौकशी करून कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6

अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील जुना बाळापूर नाक्यावर तैनात असलेले निवडणूक स्थायी पथक निष्क्रीय असल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

By

Published : Oct 20, 2019, 10:16 AM IST

Updated : Oct 20, 2019, 12:15 PM IST

अकोला- निवडणुकीच्या काळामध्ये अवैधरित्या पैसे, अमली पदार्थ, शस्त्रांची वाहतूक होण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य रस्त्यांवर स्थायी आणि भरारी पथक नेमण्यात येतात. या पथकांकडून शहरातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची तपासणी केली. परंतु, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील जुना बाळापूर नाक्यावर तैनात असलेले स्थायी पथक मात्र नावालाच असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून कोणत्याही वाहनाची तपासणी करण्यात येत नव्हती. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विचारले असता त्यांच्याकडे याबाबतची कोणतीही तक्रार नसून याबाबत माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी

निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना आमिष दाखवून त्यांना धमक्या देण्यासारखे प्रकार होतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक शहरातील मुख्य रस्त्यावर तपासणी आणि भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये विविध विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येते. हे पथक शहरातून जाणाऱ्या येणाऱ्या तसेच राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या तसेच राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची तपासणी करते. परंतु, येथील जुना बाळापूर नाका येथे तैनात असलेल्या पथकाकडून मात्र वाहनांची तपासणी तर सोडाच त्यांच्याकडे ढुंकूनही पाहण्याची तसदी कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत नव्हती. पथकाला पुरवण्यात आलेल्या वाहनांमध्ये सर्व कर्मचारी बसून आपल्या मोबाईलमध्ये गुंग होते. त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. त्यामुळे हे पथक मात्र निवडणूक काळात आणि तेही प्रचार थांबल्यानंतर कुठलीच कारवाई करत नसल्याने या दरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रकार गंभीर असून त्यासंदर्भात माहिती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

हेही वाचा - प्रचार तोफा थंडावल्या; विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटीवर उमेदवारांचा भर

Last Updated : Oct 20, 2019, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details