अकोला: जिल्ह्यातील अकोटच्या धीरज कळसाईत या तरूण गिर्यारोहकाने युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुसवर तिरंगा मोठ्या डौलाने फडकावला आहे. विशेष म्हणजे धीरज हा दिव्यांग आहे. तो एक हात आणि एका पायाने पूर्णत: अपंग आहे. यापूर्वी धीरजने कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावनखिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. 16 आ्ॅगस्टला त्याने हे शिखर सर केले आहे.
दिव्यांग धीरजची 'दिव्य' कामगिरी, सर केले युरोपातील सर्वोच्च शिखर 'माउंट एल्ब्रुस' - Mount Elbrus
जिल्ह्यातील अकोटच्या धीरज कळसाईत या तरूण गिर्यारोहकाने युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुसवर तिरंगा मोठ्या डौलाने फडकावला आहे.
धीरज कळसाईत
माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत असते. 15 आॅगस्टच्या रात्री त्याने हे शिखर चढाईला सुरुवात केली होती आणि त्यानंतर दुसऱया दिवशी सकाळी साडेआठ वाजता हे शिखर यशस्वीरीत्या सर केले आहे.