महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काम न करणाऱ्या ग्रामसेवकाना निलंबित करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

जिल्ह्याधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. या वेळी विविध कामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला.

By

Published : Aug 1, 2019, 8:58 AM IST

काम न करणाऱ्या ग्रामसेवकाना निलंबित करा - विभागीय आयुक्त पियुष सिह

अकोला -पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामामध्ये आणि शासनाच्या विविध योजन राबवताना हयगय करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश अमरावतीच्या विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणाली कोरचे यांना हे आदेश दिले. जिल्ह्याधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

काम न करणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करा - विभागीय आयुक्त पियुष सिह

बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांनी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामासंदर्भात यंत्रणानिहाय आढावा घेतला. आता पाऊस होत असून जमिनीत पुरेसा ओलावाही निर्माण झाला आहे. रोप लागवडीचे काम तत्काळ पूर्ण करावे. यामुळे रोपे जगण्याच्या प्रमाणातही वाढ होईल, अशी सूचना यंत्रणांना केली. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री आवास योजना, ई-सेवा केंद्राच्या कामकाजाबाबत आढावा घेतला. महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचाही आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details