अकोला - भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फारसे सख्य आहे, असे दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वादाचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
सध्याची परिस्थिती आमच्यासाठी आशादायक आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये भाजपही सभा घेऊ शकली नाही. मतदारांचा कल वंचित आघाडीकडे वाढला असून त्याचा फायदा आम्हाला नक्की होणार. ही लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप-सेना यांच्यामध्ये आहे. राज्यात काँग्रेस कुठेच दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला लोक कल देताना दिसत आहेत. त्यामध्येही आम्ही आघाडीवर आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.