महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांगावाखोरांना मी उत्तर देत नाही, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला - live marathi news

मी पंतप्रधान मोदी यांनाही पत्र लिहित असतो. त्यांना पत्र लिहिले यामुळेच या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त मिळाले. व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात मिळाले. ऑक्‍सिजनचाही पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यासोबतच इतर सुविधाही या राज्याला मिळाल्या आहेत. त्यामुळे काही लोकांना, काही नेत्यांना कांगावा करण्याची सवय असते. अशा कांगावाखोर नेत्यांना मी उत्तर देत नाही, अशी खोचक टीका त्यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : May 16, 2021, 4:48 PM IST

Updated : May 16, 2021, 7:23 PM IST

अकोला - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाच्या संदर्भात काँग्रेस नेत्यांबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या पत्राबाबत काँग्रेस राज्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी आज नाना पटोले यांच्यावरच निशाणा साधला आहे. कांगावाखोरांना मी उत्तर देत नाही, अशी खोचक टीका त्यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे.

कांगावाखोरांना मी उत्तर देत नाही, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

'कांगावाखोर नेत्यांना मी उत्तर देत नाही'

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज अकोला दौऱ्यावर होते. यावेळी बांधकाम तयार असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आले आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर ते माध्यमांसोबत संवाद साधत होते. यावेळी त्यांना नाना पटोले यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, मी पंतप्रधान मोदी यांनाही पत्र लिहित असतो. त्यांना पत्र लिहिले यामुळेच या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त मिळाले. व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात मिळाले. ऑक्‍सिजनचाही पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यासोबतच इतर सुविधाही या राज्याला मिळाल्या आहेत. त्यामुळे काही लोकांना, काही नेत्यांना कांगावा करण्याची सवय असते. अशा कांगावाखोर नेत्यांना मी उत्तर देत नाही, अशी खोचक टीका त्यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे.

यावेळी भाजपाचे सरचिटणीस आमदार संजय कुटे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर अर्चना मसने यांच्यासह भाजपाचे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा -काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन

हेही वाचा -Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान, महामार्गावरील अपघातात एकाच मृत्यू

Last Updated : May 16, 2021, 7:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details