महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राजीव सातव हे पक्षाच्या पलिकडे जावून संबंध जोपासणारे नेते' - राजीव सातव निधन

एक चांगला मित्र, उमदा राजकारणी हरविला आहे. त्यांच्या निधनाबद्दल अतिशय दुःख झाले आहे. विधानसभेत ते प्रश्न मांडत होते. ते प्रश्न शेवटपर्यंत नेत होते. अनेकवेळा ते भेटले की विविध प्रश्नामध्ये माझी मदत घ्यायचे. विरोधक म्हणून आम्ही त्यांना जनहिताच्या प्रश्नासाठी साथ देत असू, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : May 16, 2021, 5:43 PM IST

Updated : May 16, 2021, 5:49 PM IST

अकोला -काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्यातील राजकारणातील उमदे नेतृत्त्व हरवले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज (रविवार) अकोला दौऱ्यावर होते.

देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे ते म्हणाले, की आम्ही विधानसभेत एकत्र काम केले आहे. आमची चांगली घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी देखील ती जपली होती. अशा प्रकारचा नेता की ज्याला महाराष्ट्राची जाण होती, इथल्या प्रश्नांची जाण होती, त्यांच्या पक्षामध्ये त्यांना मोठे स्थान होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल कळले होते. एक चांगला मित्र, उमदा राजकारणी हरविला आहे. त्यांच्या निधनाबद्दल अतिशय दुःख झाले आहे. विधानसभेत ते प्रश्न मांडत होते. ते प्रश्न शेवटपर्यंत नेत होते. अनेकवेळा ते भेटले की विविध प्रश्नामध्ये माझी मदत घ्यायचे. विरोधक म्हणून आम्ही त्यांना जनहिताच्या प्रश्नासाठी साथ देत असू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -चटका लावणारी एक्झिट! वाचा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

Last Updated : May 16, 2021, 5:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details