महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gram Panchayat Election ग्राम पंचायतीचे बिगुल वाजले, उद्या होणार अकोला जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतची निवडणूक - अकोला जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणूक 2022

अकोला जिल्ह्यातील 266 ग्राम पंचायतीसाठी ( Gram Panchayat election 2022 ) रविवारी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱी ( Collector Office Akola ) कार्यालयाकडून ईव्हिएम मशीनसह सगळे साहित्य मतदान केंद्रावर पाठवण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी ( Election Department Officer ) आणि कर्मचारीही रवाना करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण ५७१ सदस्य हे अविरोध ठरले आहेत, २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे ( Deputy Collector Akola ) यांनी दिली आहे.

Gram Panchayat Election
निवडणूक साहित्य घेऊन जाताना कर्मचारी

By

Published : Dec 17, 2022, 1:35 PM IST

Updated : Dec 17, 2022, 1:48 PM IST

अकोला - जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची ( Gram Panchayat Election In Akola ) तयारी पूर्ण झाली आहे. आज जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतमध्ये निवडणूक साहित्य ( Election Materials ) पोहोचविण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनसह ( EVM Machine ) इतरही साहित्य संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन रवाना करण्यात आलेले आहे. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालय ( Akola Collector Office ) परिसरामध्ये या साहित्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

ग्राम पंचायतीचे बिगुल वाजले, उद्या होणार अकोला जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतची निवडणूक

जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतीची निवडणूकअकोला जिल्ह्यामध्ये 266 ग्रामपंचायतीची निवडणूक ( Gram Panchayat Election In Akola ) उद्या १८ डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळे पॅनल उभे आहेत. तर सरपंच पद ( Sarpanch Post ) हे जनतेतून निवडून देण्यात येणार असल्यामुळे सरपंचही यामध्ये उभे आहेत.

साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग

या ग्रामपंचायतीची होणार निवडणूकजिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात ६२ पैकी २३, अकोट-८४ पैकी ३७, मुर्तिजापूर-८६ पैकी ५१, अकोला- ९७ पैकी ५४, बाळापूर ६६ पैकी २६, बार्शी टाकळी- ८० पैकी ४७, पातूर- ५७ पैकी २८ अशा एकूण ५३२ पैकी २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात सात सदस्यीय ग्रामपंचायती १९८, ९ सद्स्यीय ५५, ११ सदस्यीय ८, १३ सदस्यीय ३ तर 15 व 17 सदस्यीय प्रत्येकी एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाली त्यावेळी एकूण ८१७ प्रभागांमध्ये ही निवडणूक व्हायची होती व त्यात २०७४ सदस्यांची निवड करायची होती.

साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग

उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतरची स्थितीउमेदवारी अर्जांची छाननी व उमेदवारी माघारीनंतर जिल्ह्यात आता तेल्हारा तालुक्यात २३, अकोट- ३६, मुर्तिजापूर-५१, अकोला-५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी-४७ तर पातूर-२८ अशा एकूण २६५ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे. यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या ६७९ असून त्यातून १४७४ सद्स्यांची निवड व्हायची आहे. एकूण ५७१ सदस्य हे अविरोध ठरले आहेत, २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण अविरोध प्रभागांची संख्या १३८ आहे. सरपंच वगळता ५ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य अविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा-१, अकोट-१, अकोला-३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग

सरपंचपदासाठी २५८ ठिकाणी निवडणूकसरपंचपदासाठी ( Sarpanch Election ) २५८ जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार अविरोध ठरले असून चार ठिकाणी सरपंचपदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही. एकंदर सरपंच व सदस्य असे मिळून १६९५ जण उमेदवारीच्या रिंगणात आहेत.

साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग

३ लाख ८ हजार ३१७ मतदार बजावणार हक्कया निवडणूकीत एकूण ३ लाख ८ हजार ३१७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १ लाख ६१ हजार ६५९ पुरुष तर १ लाख ४६ हजार ६५४ महिला व ४ इतर मतदारांचा समावेश आहे.

ईव्हीएम मशीन

तालुकानिहाय मतदार संख्या या प्रमाणे- तेल्हारा- ३११३४, अकोट- ५२०७९, मुर्तिजापूर-५८६८४, अकोला- ५६९२४, बाळापूर-२७१८५, बार्शीटाकळी-४८३३२, पातूर-३३९६२. जिल्ह्यात एकूण २५९९ दिव्यांग मतदार आहेत.

निवडणूक यंत्रणा - या निवडणूकीसाठी एकूण मतदान केंद्र ८३२ असून त्यातील संवेदनशील मतदान केंद्र १७९ आहेत. (संवेदनशील मतदान केंद्र तालुकानिहाय- तेल्हारा-७, अकोट-४२, मुर्तिजापूर-५१, अकोला-९, बाळापूर-१२, बार्शीटाकळी-३३, पातूर-२५.) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ३८७६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४२९३ मनुष्यबळ संख्या उपलब्ध करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ( Deputy Collector Akola ) संजय खडसे यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 17, 2022, 1:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details