अकोला -महिन्याभरातच गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंगांच्या किंमतीमध्ये १० ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींच्या किंमती वाढणार आहे. त्यामुळे मातीच्या गणपती मूर्तींची मागणी वाढत असल्याचे कलाकारांनी सांगितले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती महागणार; मातीच्या मूर्तींना मागणी - कलाकार
गणपती उत्सव एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. अनेक गणपती मंडळाकडून गणपती बनवण्यासाठी ऑर्डर देण्यात येत आहे. भक्तांकडून मातीच्या गणपतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे कलाकार देखील मातीचे गणपती बनवण्यात मग्न झाले आहेत.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती महागणार; मातीच्या मूर्तींना मागणी
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतर जवळपास एका महिन्यातच गणपती उत्सव येऊ घातला आहे. अनेक गणपती मंडळाकडून गणपती बनवण्यासाठी ऑर्डर देण्यात येत आहे. भक्तांकडून मातीच्या गणपतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे कलाकार देखील मातीचे गणपती बनवण्यात मग्न झाले आहेत. यासाठी यवतमाळ येथून लाल माती आणून त्याचे गणपती बनविण्यात येत आहे. या मातीचे गणपती टिकाऊ आहेत. तसेच मूर्तीला तडे जात नाहीत. तसेच ही मूर्ती लवकर विरघळते. त्यामुळे या मूर्तीला चांगली मागणी आहे.