अकोला - फेक अकाउंटद्वारे लोकांना फसवणे हा नवीन प्रकार नाही. मात्र, याचा फटका अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरांना बसला असून याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना पैशांची मागणीसुद्धा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी हे अकाउंट राजस्थान राज्यातील एका जिल्ह्यात बनविण्यात आले असल्याचे समोर आले आहे. हे अकाउंट लगेच बंद करण्यात आले आहे.
अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी पोलीस तपास सुरू -
याबाबत सिव्हिल लाइन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. यासाठी सायबर पोलिसांच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. सायबर पोलिसांनी हे अकाउंट राजस्थान राज्यातील एका जिल्ह्यात बनविण्यात आले असल्याचे समोर आले आहे. त्यांनी हे अकाउंट लगेच बंद करण्यात आले आहे. बनावट फेसबुक वरील अकाऊंटचे शिकार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी 'मला कोणाच्याही पैशांची गरज नाही' -
माझ्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट फेसबुक अकाउंट वरून जर कोणाला पैशांची मागणी होत असले तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करा. मला कोणाच्याही पैशांची गरज नाही. याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.