अकोला- आलेगाव येथील धनगर पुऱ्यातील सिंगल फेज रोहीत्रचा शॉक लागून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून शेतकरी थोडक्यात वाचला.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील अशोक शालीग्राम महल्ले नेहमीप्रमाणे बैल शेतात चरण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी धनगर पुऱ्यातील सिंगल फेज रोहीत्राचा विज प्रवाह जमीनीत आला होता. त्यावेळी बैल रोहीत्रा जवळून जात असताना त्याला शॉक लागला. त्यामुळे बैलाचा जागीच मृत्यू झाला.