अकोला - चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अमित सावल याचा मृतदेह महान धरणात सापडला. संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाने मृतदेह शोधून काढला.
शहरातील औषध व्यावसायिकांचा मुलगा अमित सावल हा 23 सप्टेंबरला घरातील दागिने घेवून निघून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता त्याची दुचाकी महान धरणाजवळ सापडली. त्याची चप्पल, मोबाईल हे महान धरणाच्या गेट क्रमांक तीन दरवाज्यावर सापडली. तेव्हापासून तिथे संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक अमितचा शोध घेत होते. गुरूवारी दुपारी अमितचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले.