महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीपूर्वी सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी, सोयाबीनची आवक वाढली - अकोला बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली

सोयाबीन विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी गर्दी करत आहेत. बाजार समितीत मंगळवारी तब्बल सहा हजार 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार 175 रुपयांचा दर मिळत आहे.

soybean arrivals increased, akola
अकोला बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली

By

Published : Nov 10, 2020, 3:22 PM IST

अकोला -दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत धाव घेतली आहे. बाजार समितीत मंगळवारी तब्बल सहा हजार 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार 175 रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी गर्दी केली आहे. आज तब्बल सहा हजार 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार 175 रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यातय येत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनला प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे पिकात घट झाली असून, सोयाबीनची आवक कमी असल्याने चांगला दर मिळत आहे. दिवाळी सण आणि रब्बी हंगामातील पेरणीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details