अकोला- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील व्याळा जवळ डीझलने भरलेला टँकर उलटल्यामुळे त्यातील सांडलेले डिझेल नागरिकांनी अक्षरशः जमा केले. बादल्या, प्लास्टिक कॅन, प्लास्टिक बॉटलमधून नागरिकांनी डिझेल भरून नेले. राष्ट्रीय महामार्गावर या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या अपघातात कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. ही घटना आज ( दि. 14 नोव्हेंबर) दुपारी घडली.
अकोला येथून खामगावकडे जाणारा टँकर राष्ट्रीय महामार्ग सहावरील व्याळा जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उलटला. हा टँकर डिझेलने भरलेला होता. टँकर उलटल्यानंतर त्यातील डिझेल हे खाली सांडत होते. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात हा टँकर उलटला. त्याच खड्ड्यात हे डिझेल जमा झाले.