अकोला - सोशल मीडियावर कोरोना संदर्भात मेसेज टाकून दोन भिन्न समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या दोघांविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पारस येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदीच्या आदेशाला न जुमानणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे आहे. हे दोन्ही गुन्हे बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. तसेच पारस येथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
सावधान..! खोटा मेसेज पाठवणाऱ्यासह अॅडमीनवरही पोलिसांनी केला गुन्हा दाखल - latest corona news
सोशल मीडियावर कोरोना संदर्भात मेसेज टाकून दोन भिन्न समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या दोघांविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पारस येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदीच्या आदेशाला न जुमानणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे आहे.
पहिल्या प्रकरणात गजानन साहेबराव राऊत, अनिल पांडुरंग राऊत अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात यांनी मेसेज पाठविले होते. त्यामुळे ग्रुप अॅडमीन व पाठविणारा अशा दोघांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत, तरीही काहीजण पारस येथे जमाव करीत असल्याच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये आरोपी म्हणून शाकिर अली आबिद अली सय्यद, सय्यद आजम सय्यद रसूल, अमीन खान हमीद खान, मोहम्मद जफर मोहम्मद रफीक, अमिनोद्दिन मोहम्मद इस्लाम, इरफान खान बिस्मिल्ला खान, बिलाल खान जलाल खान, जमील अहमद अब्दुल अहमद, शेरू पठाण हारून पठाण या सर्वांना अटक करण्यात आली आहे. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पारस येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.