महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

British bridge damage : ब्रिटिशकालीन देशातील 'या' पहिल्या पुलाला गेले तडे; वाहतूक केली बंद - countrys 100 year old Gandhigram bridge

अकोला ते अकोट जोडणाऱ्या पूर्णा नदीवरील गांधीग्राम येथील ब्रिटिश कालीन ( British bridge damage ) म्हणजेच 1927 मध्ये उद्घाटन झालेला पूल आज वाहतुकीसाठी बंद ( Bridge closed to traffic today ) करण्यात आला.

British bridge damage
शंभर वर्षे जुना गांधीग्राम पुलाला तडे

By

Published : Oct 19, 2022, 8:17 AM IST

अकोला :अकोला ते अकोट जोडणाऱ्या पूर्ण नदीवरील गांधीग्राम येथील ब्रिटिश कालीन ( British bridge damage ) म्हणजेच 1927 मध्ये उद्घाटन झालेला पूल वाहतुकीसाठी बंद ( Bridge closed to traffic today ) करण्यात आला. या पुलाला तडे गेल्यामुळे हा पूल बंद करण्यात आला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक दुसरीकडे वळविण्यात आली आहे. दरम्यान, या पुलाच्या खांबामध्येच तडे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पूल आज वाहतुकीसाठी बंद

देशातील पहिला रीइनफोर्स ऑफ कॉंक्रीटचा पूल: 1927 च्या आधी बांधण्यास सुरू झालेल्या या पुलाला देशातील पहिला रीइनफोर्स ऑफ कॉंक्रीटचा हा पूल देशात पहिल्यांदाच बांधण्यात आला होता. प्रायोगिक तत्त्वावर हा पूल बांधण्यात आला होता. तेव्हापासून हा पूल वाहतुकीसाठी वापरण्यात येत होता. मध्य प्रदेशला जोडणारा हा रस्ता आहे. मेळघाटच्या जंगलामधून हा रस्ता जातो. पावसाळ्यामध्ये पुलाच्या 15 ते 20 फूट वर असलेल्या पाण्यात हा पूल तटस्थ राहत होता. शंभरी गाठत असलेल्या या पुलाच्या खांबांना तडे गेले आहे. परिणामी ही बाब प्रशासनाच्या लक्षात येतात. त्यांनी वाहतूक दुसरीकडे वळविली आहे.


गोपालखेडचा अर्धवट पूल बांधकामाच्या प्रतीक्षेत: पूर्णा नदीवरील पूर हा खूप मोठा असल्याने या पुलावरून वाहतूक दर पावसाळ्यात बराच वेळा बंद राहत होती. परिणामी यासंदर्भामध्ये प्रशासनाने निर्णय घेत गोपालखेड येथे ब्रिटिश कालीन पुलापेक्षा उंच पूल बांधला. परंतु, या पुलाचा ढाचा प्रशासनाकडून बांधण्यात आला. मात्र, त्याला रस्ताच अद्याप न जोडला गेल्यामुळे या पुलाचा फक्त ढाच्याच उभा आहे. या पुलासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी असून न्यायालयीन प्रक्रियेत या पुलाचे काम प्रलंबित असल्याची माहिती आहे. परिणामी गोपालखेडचा अर्धवट पूल अजूनही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.


वाहतूक संपुर्णपणे बंद : गांधीग्राम येथील जुन्‍या पुलाला तडा गेल्‍यामुळे त्‍यावरील वाहतूक संपुर्णपणे बंद करण्यात आली आहे. हा पूल तातडीने दुरुस्त करुन वाहतुकीसाठी पुर्ववत खुला होईपर्यंत अकोला – अकोट रहदारीकरीता पर्यायी मार्ग म्‍हणून अकोला – म्‍हैसांग – सासन किनखेड दहीहांडा राज्‍य मार्गास जोडणारा व अकोला – म्‍हैसांग – दर्यापूर – अकोट राज्‍य मार्ग वळविण्‍यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.


पुल दुरुस्तीसाठी बंद : या संदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार ही रहदारी वळविण्यात आली आहे. या आदेशान्वये अकोला ते अकोट रहदारीसाठी पर्यायी मार्ग म्‍हणून अकोला – म्‍हैसांग – सासन किनखेड दहीहांडा राज्‍य मार्गास जोडणारा व अकोला म्‍हैसांग दर्यापूर अकोट या मार्गे वळविण्यात आली आहे. गांधीग्राम येथील पुल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details