अकोला -पंतप्रधान आवास योजनेतील गुंठेवारी घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेने आज मनपा आयुक्तांच्या कक्षात आंदोलन केले. यावेळी आयुक्त कार्यालयात नसल्याने, शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निवेदन दिले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
विविध मागण्यांसाठी आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शिवसेना नगरसेवकांचे आंदोेलन - अकोला नगरसेवकांचे आंदोलन
पंतप्रधान आवास योजनेतील गुंठेवारी घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेने आज मनपा आयुक्तांच्या कक्षात आंदोलन केले. यावेळी आयुक्त कार्यालयात नसल्याने, शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निवेदन दिले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
नगररचना विभागात उपलब्ध असलेले नकाशे मंजूर करून काम सुरू करावे, ज्या कुटुंबाकडे जागा नसेल, मात्र ते गेल्या अनेक वर्षांपासून त्या जागेवर रहात असतील तर, त्यांना त्या जागेचा मालकी हक्क देण्यात यावा, तसेच अशा कुटुंबाना घरकुल योजनेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली. नगरसेवकांनी आयुक्तांना आंदोलनाची सूचना दिली होती, मात्र ते बाहेर गावी गेल्याने संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले. यावेळी नगरसेवक राजेश मिश्रा, मंजुषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, गजानन चव्हाण यांची उपस्थिती होती.