अकोला- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात अद्यापही भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झालेले नाही. सत्ता स्थापनेबाबत निर्माण झालेला तिढा वाढतच चालला आहे. तसेच शिवसेनेकडून सेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी सुरू असलेली चढाओढ लक्षात घेता सेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी पत्नीसह अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात काल (बुधवार) दुपारी होमहवन केले.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा..! सेनेच्या नगरसेवकांनी केले सपत्नीक होम हवन
सेनेचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी पत्नीसह अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात काल (बुधवार) दुपारी होमहवन केले.
सत्तास्थापनेचे संदर्भात भाजप-सेना या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली चढाओढ ही अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु, त्यांच्या युतीमधील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे भाजप-सेना युतीतील सुरू असलेली चढाओढ थांबवून शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी अकोला शहरातील महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात होम हवन केले.
यावेळी नगरसेवक राजेश मिश्रा त्यांच्या पत्नी, नगरसेवक गजानन चव्हाण त्यांच्या पत्नी, शिवसेनेचे नेते तरुण बगैरे हे पत्नीसह या होम-हवन कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी जिल्हा महिला प्रमुख देवश्री ठाकरे, युवा सेना प्रमुख यांच्यासह सेनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.