महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात सर्वधर्म समभावचा प्रत्यय, कोरोना योद्ध्यांकडून ४०० रुग्णांवर अंत्यसंस्कार - Cutchi Memon Jamaat Akola

अकोल्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्ण संख्या वाढत गेली. अशातच एका रुग्णाने उपचारादरम्यान आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या या कोरोना रुग्णावर उपचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या खांद्याला खांदा लावून साबिर कुरेशी, आसिफ अहमद खान, तनवीर खान आदींनी संशयित आणि पॉझिटिव्ह अशा मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार केले.

कोरोना योद्ध्यांकडून ४०० रुग्णांवर अंत्यसंस्कार
कोरोना योद्ध्यांकडून ४०० रुग्णांवर अंत्यसंस्कार

By

Published : Oct 24, 2020, 10:13 PM IST

अकोला- कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ही कठीण होती. कोणीही मृतांना शिवत नव्हते. परंतु, शहरातील काही कोरोना योद्ध्यांनी प्राणांची पर्वा न करता ४०० कोरोना रुग्णांचा अंत्यसंस्कार केला आहे. असे करून योद्ध्यांनी सर्वधर्म समभावचा प्रत्यय दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यापैकी एकही जण हा अजूनपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही.

माहिती देताना कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया

अकोल्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्ण संख्या वाढत गेली. अशातच एका रुग्णाने उपचारादरम्यान आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या या कोरोना रुग्णावर उपचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या खांद्याला खांदा लावून साबिर कुरेशी, आसिफ अहमद खान, तनवीर खान, जावेद खान शाहबाज खान, वसीम खान, समीर खान, एजाज, नदीम भाई, अफसर कुरेशी यांनी हा अंत्यसंस्काराचा विडा उचलला. सर्वांनी संशयित आणि पॉझिटिव्ह अशा मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार केले. एका रुग्णवाहिकेच्या सहायाने त्यांनी दिवसरात्र हे काम सुरू ठेवले.

समाजाचा किंवा धर्माचा विचार न करता अंत्यसंस्कार

मृतक हा कोणत्या समाजाचा किंवा धर्माचा आहे, हा विचार त्यांनी जकारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कधीच केला नाही. धर्मानुसारच मृतकाचे त्याच्या नातेवाईकांच्या समक्ष अंत्यसंस्कार केले. मृत कोरोना रुग्ण हे मनपाच्या माध्यमातून जमातच्या सदस्यांना सोपवण्यात येत होते. त्यानुसार त्यांनी आपले कार्य सुरू केले. न थांबता, कुठल्याही मोबदल्याचा विचार न करता त्यांनी हे कार्य अविरत सुरूच ठेवले आहे.

सुरक्षा किट घालून मृतकांवर अंत्यसंस्कार

जमातीचे सदस्य सुरक्षा किट घालून मृतकांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. मुस्लीम स्मशानभूमीचे बाबा भाई आणि हिंदू स्मशानभूमीचे दीपक शिंदे यांचेही त्यांना संपूर्ण सहकार्य लाभले. सावतराम मिल येथील हिंदू स्मशानभूमीचे अध्यक्ष राम राठी, कब्रस्तानचे हाजी मुदाम भाई, मनपा आरोग्य अधिकारी प्रशांत राजूरकर यांनी ही जमातच्या सदस्यांना सहकार्य केले. विशेष म्हणजे, अकोल्यातील सर्व हिंदू आणि मुस्लीम स्मशानभूमीत त्यांनी रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. तसेच, अकोला, बुलडाणा, वाशिम येथील अकोल्यात उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण व त्यांच्या मृत्यूनंतर, असे ४०० रुग्णांचे सदस्यांनी अंत्यसंस्कार केले असल्याचे जावेद जकारिया यांनी सांगितले.

हेही वाचा-आगामी उत्सवात शांतता भंग होऊ नये यासाठी पोलीस दल सतर्क

ABOUT THE AUTHOR

...view details