अकोला- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात पोलीस विभागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे, संरक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि कोरोना टेस्ट करण्यासाठी आयएमए असोसिएशनच्या डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. आज आयएमए सभागृहामध्ये 1 हजार 145 पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली.
अकोल्यात पोलिसांच्या आरोग्य तपासणीसह कोरोना टेस्ट, आयएमएचा पुढाकार - अकोल्यात पोलिसांची आरोग्य तपासणी
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 1041 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अशात संकटकाळात सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 1041 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अशात संकटकाळात सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. असोसिएशनच्या कार्यालयांमध्ये 1 हजार 145 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, असोसिएशनचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे पोलिसांना आरोग्यवर्धक दिलासा मिळाला आहे. सोबतच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठीही आयएमए असोसिएशन पुढे आली आहे, हे कौतुकास्पद आहे. यासाठी असोसिएशनचे डॉ. कमल लढ्ढा, डॉ. आशिष डेहनकर, डॉ. अविनाश पाटील, डॉ. शिरीष डेहनकर, डॉ. ज्ञानेश्वर इंगळे, डॉ. गोपाल ढगे आदी यामध्ये सहभागी आहेत.