अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी सकाळी सातने वाढ झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे, शुक्रवारी रात्री पाच जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. पॉझिटिव्ह आलेले रुग्णांमध्ये सहा महिला व एक पुरुष आहे.
आज सकाळी पात्र झालेल्या कोरोना अहवालातील सात जणांपैकी पाच जण हे फिरदोस कॉलनी परिसरातील रहिवाशी आहे. तर एक जण माणिक टॉकी जवळील टिळक रोड परिसराचा राहणारा आहे. रहिलेला एक जण लोहिया नगर खोलेश्वरचा आहे.
दरम्यान, आजच्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३६२ इतकी झाली आहे. यात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२८ जणांवर उपचार सुरू आहेत, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.