अकोला - शहराच्या मधोमध भागातून नवीन उड्डाणपुलाचे काम हे प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाचा बांधकामामध्ये रस्त्याच्या मधोमध मोठे मोठे खांब उभे केले जात आहेत. आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास अशोक वाटिकेकडून स्थानकाकडे जात असलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या खांबाला धडक दिली. यात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उंचीचा अंदाज न आल्याने कंटेनर उड्डानपुलाला धडकला हेही वाचा - विटा वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याने तीन कामगार ठार, चार जखमी
अपघात टॉवर चौकाजवळील शास्त्री स्टेडियमसमोर घडली असून अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चालकाला खांबाच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे त्याने खांबाला धडक दिली असावी, अशी शंका व्यक्त होत आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने समोरील काच फोडून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांनीच वाहतूक सुरळीत केली आहे.
हेही वाचा -"भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यात 'प्रॉब्लेम' काय ?"