महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुस्लिम वंचित बहुजन आघाडीपासून दूर, अकोल्यात काँग्रेसच होणार विजयी - पटेल

२०१४च्या निवडणुकीत प्रमुख तीन पक्षातील तेच चेहरे आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांकडून ही लढत एकतर्फी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

By

Published : Mar 29, 2019, 12:42 PM IST

अकोला - अकोला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्यापासून फुटणार आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसकडून हिदायत पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आली. दरम्यान, या निवडणुकीत आपण काँग्रेसचाच विजय होईल, असा आशावाद हिदायत पटेल यांनी व्यक्त केला आहे.

हिदायत पटेल

२०१४च्या निवडणुकीत प्रमुख तीन पक्षातील तेच चेहरे आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांकडून ही लढत एकतर्फी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी सर्व समाज एकत्र केल्याचा कांगावा करीत एमआयएमला सोबत घेतले. त्यामुळे सोबत आलेल्या इतर समाज हा दूर गेला आहे. एमआयएमला पसंत न करणारे मुस्लिम वंचित बहुजन आघाडीपासून दूर गेले आहेत. हे मतदार काँग्रेसला मतदान करणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी ईटीव्ही भारतशी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details