अकोला- सोनभद्र येथे झालेल्या नरसंहारातील पिडीतांच्या कुटुबियांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. प्रियंका गांधीच्या अटकेच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
प्रियंका गांधी यांच्या अटकेविरोधात काँग्रेसची निदर्शने - Congress
प्रियंका गांधींना अटक करण्यात आली याच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सिटी कोतवाली समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी घोषणाबाजी करत उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
विजय शर्मा, राजेन्द्र चितलांगे, गणेश कटारे, राजेश पाटील, मनिष नारायणे, देविदास सोनोने, डॉ. मोहन खरे, डॉ. सुधाकर कोपेकर, डॉ. प्रेमशंकर तिवारी, आकाश शिरसाट, अंकुश गावंडे, भगवान बोयत, विजयाताई राजपुत, सिमा ठाकरे ,वर्षा बडगुजर, नवनित राजपुत, रफी उल्ला खान, धनराज सत्याल, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.