अकोला:अकोल्यात ते एका कार्यक्रमात आले असता त्यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. पुढे ते म्हणाले, मी भाजपची खासदारकी 2017 मध्ये सोडून आलेलो आहो. मला माहित आहे ते कसे लोक आहेत. भाजप लोकतांत्रिक व्यवस्थेच्या विरोधातील पक्ष आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका ही त्यांनी भाजपवर केली आहे. त्यामुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये पहिले सारखी सहानुभूती राहिलेली नाही. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नाकातील केस असलेल्या पदवीधर मतदार संघातील उमेदवारास पदविधरांनी पाडले आहे. त्यामुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असल्याचे ही ते म्हणाले.
Nana Patole News : दुसऱ्यांचे घर फोडून स्वतःचे घर सजवू नये; नाना पटोले यांचा भाजपला सल्ला - बेरोजगारमुळे लोक हैराण आहेत
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार केंद्र बिंदू ठरले आहेत. दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे हे डोकावून पाहण्याच काम काँग्रेस कधी करत नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार हे भाजपमध्ये जाणार का या प्रश्नाचं उत्तर देतांना म्हणाले. तर दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये असा सल्ला ही नाना पटोले यांनी भाजपला दिला. तर अजित पवार भाजप सोबत जाणार की नाही या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसून अजित पवार महाविकास आघाडीत राहणार असल्याचंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसला दुसऱ्याच्या घरात झाकून पहायची सवय नाही: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले हे मला माहित नाही. दुसऱ्याच्या घरात झाकून पहायची सवय काँग्रेसला नाही. आज शेतकरी हवालदिल झाला आहे. बेरोजगारमुळे लोक हैराण आहेत. या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणणे काँग्रेसचा धर्म आहे. सत्तेसाठी काहीपण, सत्ता पिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे. या विरोधात काँग्रेस आहे. एकमेकांची घरफोडण्याचे काम भाजपने सुरू केले आहे, ते त्यांनी करू नये असा सल्ला ही नाना पाटोले यांनी दिला आहे.
माध्यमातून विरोधकांना दाबण्याच काम सुरू: अजित पवारांची माहिती माझ्याकडे नाही, लोटस हा प्रेमाचा शब्द आहे. दुसऱ्याची घर तोडणार नाही. हा तानाशाही प्रवृत्तीचा चमत्कार होऊ शकतो, केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआय हे दोन बंदर पकडून ठेवली आहे. त्याच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याच काम सुरू आहे. ज्यांच्यासोबत लोकशाहीत जनता असते त्यांना प्लॅन बी करण्याची गरज नाही. त्यामुळे सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तसेच अजित पवार यांच्यासोबत मी नागपुराच्या सभेत होतो. त्यांच्याशी बोलतांना असे काही वाटले नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते या पक्षाला सोडून जाणार नाहीत, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसेच अजित पवार भाजपाबरोबर जातील असे मला वाटत नाही. आम्ही परवाही वज्रमुठ सभेच्या माध्यमातून नागपूरला सोबत होतो. असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Ajit Pawar News अजित पवारांचे राष्ट्रवादीत बंड जाणून घ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया