अकोला - रात्री पडलेल्या पावसानंतर पहाटेपासूनच वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे अधिक थंडावा निर्माण झाला असून या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप या रोगाचे रुग्ण वाढले आहेत. तर पिकांवरही या वातावरण बदलाचा परिणाम दिसून येत आहे.
अकोल्यात पावसासह वातावरणात बदल; पिकांवर परिणाम - अकोला पाऊस बातमी
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासूनच वातावरणात बदल झाला होता. रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणातील थंडावा अधिक गडद झाला. तसेच पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
हेहा वाचा-वाद घालणे अन् भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासूनच वातावरणात बदल झाला होता. रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणातील थंडावा अधिक गडद झाला. तसेच पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे अशक्य झालेले आहे. तरीही चाकरमाने आपल्या कामाला निघाले आहेत. आज सकाळपासूनच सुर्याचे दर्शन झालेले नाही. दरम्यान, या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतातूर झालेला आहे. आधीच ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या हातातील पीक हिसकावून घेतले. त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तूर आणि हरभरा पीक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्यासाठी हे वातावरण पोषक असल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंता सतावत आहे.