अकोला - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना बी. टी. बियाणे वाटप योजना राबवली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना आज धनादेश वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आला.
अकोल्यातील बी. टी. बियाणे लाभार्थ्यांना धनादेश वितरण - अकोला बी. टी. बियाणे धनादेश न्यूज
अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने बियाणे वाटपासाठी अनोखी योजना आणली होती. यातील निवड झालेल्या शेतकऱ्यांना आज बी. टी. बियाणे खरेदीसाठी धनादेश वाटण्यात आले.
![अकोल्यातील बी. टी. बियाणे लाभार्थ्यांना धनादेश वितरण Cheque Distribution](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9319002-69-9319002-1603714474785.jpg)
या कार्यक्रमाला प्रा. अंजली आंबेडकर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने होत्या. कृषी सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्यासह जिल्हा परिषद विविध विषय समिती सभापती, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांची ही महत्वाकांक्षी योजना होती. या योजनेत ८ हजार ५०० पेक्षा जास्त शेतकऱयांनी सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी 193 लाभार्थी निवडण्यात आले आहेत. इतर लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज झालेल्या धनादेश वाटप कार्यक्रमात तीन लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकारी डॉ. इंगळे यांनी सांगितले.