अकोला - अकोट तालुक्यातील मुंडगाव जवळील चंद्रिका नदीला पूर आला आहे. या नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली आहे. दरम्यान, या घटनेमुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाहतूक पूर्णपणे बंद
महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या, जोरदार पावसामुळे आजही अकोल्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यात जोरदार पाऊस आला आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव जवळील चंद्रिका नदीवरील गावचा पूल दळणवळणासाठी महत्त्वाचा पूल आहे. या नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीने रौद्ररुप धारण केल आहे. या नदीवरील पूल हा नदीच्या पाण्याखाली आला आहे. परिणामी, या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे मुंडगाव जवळील चंद्रिका नदीला पाणी गेल्यामुळे लोहरी, वणी वारुळा, आळेगाव, बलेगाव, लमाकानी अशा आठ गावांचा संपर्क तुटला आहे.