अकोला - राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात विकासाची कामे केली नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ते असे नक्कल करीत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Central Minister Raosaheb Danve on Bhaskar Jadhav ) यांनी भास्कर जाधव आणि राज्य सरकारवर केली आहे. ते अकोल्यात खासदार संजय धोत्रे ( Raosaheb Danve meet Sanjay Dhotre ) यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी खासदार धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दानवे पुढे ते म्हणाले, राज्य सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे ते केंद्रीय नेत्यांवर आरोप करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हे सरकार कोणत्या पातळीवर गेले आहे, हे यावरून दिसते. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते मंत्रालयात कितीवेळा गेले हे पहिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लावला आहे. हे काही पहिल्यांदा झाले नाही. परंतु, त्यांची प्रकृती चांगली होवो, ही प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
ओमीक्रॉन ( Omicron Variant ) संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून काळजी घेणार -