अकोला -शिवजयंतीनिमित्त कुटासा गावात काढण्यात मिरवणुक काढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी तसेच सहभागी 300 जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन सत्तेत सहभागी पक्षातील आमदारांकडून होत असल्यामुळे इतरांनी नियम का पाळावे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सत्ताधारी पक्षातील आमदारच तोडत आहे नियम -
जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने या संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच अकोला, अमरावती, नागपूर यासह इतर जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असल्याने या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभागी होऊ नये, असे आदेश काढले होते. असे असतानाही सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनीच कोरोना प्रतिबंधक नियम तोडण्यात आघाडी घेतली आहे.